प्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले

आयपीएलच्या नवव्या मोसमातल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आयपीएलची मेगा फायनल होणार आहे. 

Updated: May 28, 2016, 08:01 PM IST
प्रवीण कुमार-डेव्हिड वॉर्नर मैदानावर भिडले title=

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या मोसमातल्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सनरायजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा पराभव केला आणि आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली. आता रविवारी हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये आयपीएलची मेगा फायनल होणार आहे. 

सनरायजर्स हैदराबादच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो डेव्हिड वॉर्नर. वॉर्नरनं 58 बॉलमध्ये नाबाद 93 रनची खेळी केली. या मॅचच्या 17 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा बॉलर प्रवीण कुमार आणि डेव्हिड वॉर्नरची बाचाबाची झाली. 

वॉर्नरनं बॉल प्रवीण कुमारच्या दिशेनं सरळ खेळला, तेव्हा प्रवीण कुमारनं बॉल स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला, पण वॉर्नर स्टंपच्या समोरच उभा राहिला. यावेळी वॉर्नर प्रवीण कुमारला काहीतरी बोलला, ज्यामुळे प्रवीण कुमार वैतागला आणि वॉर्नरच्या दिशेनं धाऊन गेला. या दोघांमधला वाद विकोपाला जाणार एवढ्यात विकेट कीपर दिनेश कार्तिकमध्ये आला आणि त्यानं प्रवीण कुमारला थांबवलं.