बलाढ्य बंगलोरसमोर दिल्लीचा विजय

बलाढ्य अशा रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 7 विकेट्सनी विजय झाला आहे. या मॅचमध्ये दिल्लीच्या क्वांटन डि कॉकनं शानदार सेंच्युरी झळकावली. यंदाच्या आयपीएल मोसमातील ही पहिलीच सेंच्युरी आहे. 

Updated: Apr 17, 2016, 11:43 PM IST
बलाढ्य बंगलोरसमोर दिल्लीचा विजय title=

बंगलोर: बलाढ्य अशा रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 7 विकेट्सनी विजय झाला आहे. या मॅचमध्ये दिल्लीच्या क्वांटन डि कॉकनं शानदार सेंच्युरी झळकावली. यंदाच्या आयपीएल मोसमातील ही पहिलीच सेंच्युरी आहे. 

बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. दिल्लीचा कॅप्टन झहीर खाननं स्वत:चा हा निर्णय योग्य ठरवत ख्रिस गेलला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

त्यानंतर मात्र विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं बंगलोरच्या इनिंगला आकार दिला. विराट कोहलीनं 48 बॉल 79 रन केल्या, तर एबीनं 33 बॉलमध्ये 55 रन केल्या. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या वॉटसनंही 19 बॉलमध्ये 33 रन करून बंगलोरला 191 रन पर्यंत पोहोचवलं. दिल्लीकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. 

192 रनचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरला श्रेयस अय्यर शून्यावर आऊट झाला. त्यानंतर मात्र डिकॉक आणि करुण नायरनं दिल्लीला जिंकवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. डिकॉकनं 51 बॉलमध्ये 108 रन केल्या, तर नायरनं 42 बॉलमध्ये 54 रन बनवल्या.