संघाच्या कामगिरीवर धोनी खुश, युवराजचेही केले कौतुक

भारताने आशिया कपमध्ये श्रीलंकेला पाच विकेटनी हरवत फायनलमध्ये धडक मारलीये. सामना संपल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाची चांगलीच स्तुती केली. 

Updated: Mar 2, 2016, 08:21 AM IST
संघाच्या कामगिरीवर धोनी खुश, युवराजचेही केले कौतुक title=

मिरपूर : भारताने आशिया कपमध्ये श्रीलंकेला पाच विकेटनी हरवत फायनलमध्ये धडक मारलीये. सामना संपल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघाची चांगलीच स्तुती केली. 

संघाच्या कामगिरीत सातत्य असणे गरजेचे असते. गेल्या १० टी २० सामन्यांपैकी ९ सामन्यांत आम्ही विजय मिळवलाय. आमचा संघ चांगली कामगिरी करतोय, असे धोनी म्हणाला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज खेळी करणाऱ्या युवराजचेही त्याने यावेळी कौतुक केले. 

युवराजने १८ चेंडूत दमदार खेळी करताना ३५ धावा कुटल्या. युवराजला या फॉर्ममध्ये परतल्याने पाहून आनंद झाला, असे धोनीने सांगितले. बांगलादेशमध्ये आशिया कपसाठी बनवण्यात आलेल्या पिचवरुन काही दिवसांपूर्वी धोनीने जोरदार टीका केली होती. मात्र या सामन्यातील पिचबाबत तो संतुष्ट होता. या पिचवर बॉल ग्रिप होत होता.