ऑकलंड : आयसीसी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये मंगळवारी न्यूझीलंडच्या हाती दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला, दक्षिण आफ्रिकेसाठी हा पराभव निराशाजनक होता. निराश झालेला टीमचा कॅप्टन अब्राहम डिव्हिलिअर्स म्हणाला, मला माहित नाही यापुढील दिवसांमध्ये टीम काय करेल.
सामन्याच्या पत्रकार परिषदेनंतर एबी डिव्हिलिअर्स म्हणाला, मला माहित नाही यापुढे आमची टीम काय करणार आहे, आम्ही कधी आमच्या मायदेशी परतणार आहोत, एक टीमचा कॅप्टन म्हणून मी सदैव त्यांच्यासोबत राहणार आहे, यापेक्षा जास्त आम्ही काहीही सांगू शकत नाही.
हा सामना आणि वर्ल्डकप जिंकण्यासाठी आम्ही जीव तोडून मेहनत केली पण आम्ही वर्ल्डकप पर्यंत पोहचू शकलो नाही याचं आम्हाला खरं दु:ख आहे.
डिव्हिलिअर्स म्हणतो, हे सांगण फार कठीण आहे, की पराभवानंतर माझ्या टीमला कसं वाटतंय, हे अंत्यत वेदनादायक आहे, ज्या प्रकारे आमच्या देशातले प्रशंसक आमचा उत्साह वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियात आले होते. आम्हाला काहीही करून वर्ल्ड कप जिंकायला हवा होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.