...हाच भारतीय 'सैराट' तोडू शकेल सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड!

इंग्लंडचा माजी क्रिकेटर डोमनिक कॉर्क यानं भारताचा बॅटसमन विराट कोहली याचं कौतुक केलंय. विराट हा सचिन तेंडुलकरची बरोबरी करू शकतो, असंही कॉर्कनं म्हटलंय. 

Updated: May 19, 2016, 04:00 PM IST
...हाच भारतीय 'सैराट' तोडू शकेल सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड! title=

लंडन : इंग्लंडचा माजी क्रिकेटर डोमनिक कॉर्क यानं भारताचा बॅटसमन विराट कोहली याचं कौतुक केलंय. विराट हा सचिन तेंडुलकरची बरोबरी करू शकतो, असंही कॉर्कनं म्हटलंय. 

काय म्हणालाय कॉर्क

'सचिन तेंडुलकरशी कुणी बरोबरी करू शकतं, असं म्हणणं खूप मोठी गोष्ट असेल. परंतु, वर्तमानात कोहलीसमोर प्रत्येक बॉलर फारच साधारण वाटतात. कुणाला माहीत... दहा वर्षानंतर आपण याच प्लॅटफॉर्मवर म्हणत असू की विराट हा सचिनपेक्षा उजवा आहे' असं कॉर्कनं म्हटलंय. 

विराटची कामगिरी

तेंडुलकरनं ४६३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये १८,४२६ रन्स बनवलेत. यामध्ये ४९ शतकांचा समावेश आहे. कोहली एव्हाना १७१ मॅच खेळलाय आणि यांमध्ये त्यानं ७२१२ रन्स बनवलेत. इंडियन प्रीमियर लीगमध्येही एका सत्रात सर्वाधिक रन्स बनवणारा क्रिकेटर म्हणून त्यानं रेकॉर्ड प्रस्थापित केलाय.