सौरव गांगुलीच्या पत्नीच्या गाडीला अपघात

माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन आणि सीएबी अध्यक्ष सौरव गांगुली याची पत्नी डोना गांगुली हिच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीय. 

Updated: Jan 16, 2016, 12:22 PM IST
सौरव गांगुलीच्या पत्नीच्या गाडीला अपघात title=

कोलकाता : माजी भारतीय क्रिकेट कॅप्टन आणि सीएबी अध्यक्ष सौरव गांगुली याची पत्नी डोना गांगुली हिच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीय. 

सुदैवानं डोना या अपघातातून थोडक्यात बचावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोना आपल्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी आपल्या मर्सिडीज बेंज या गाडीतून निघाली होती. त्याच दरम्यान जेम्स लोंग सरणीजवळ हा अपघात घडला. 

सामानानं भरलेल्या एका ट्रकनं डोनाच्या गाडीला पाठिमागून धडक दिली. यामुळे, डोनाच्या गाडीचं नुकसान झालं असलं तरी ती मात्र सुखरुप बचावलीय.

याबद्दल ठुकूरपुकूर स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक करून ट्रक जप्त केलाय.