close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.

Updated: Mar 30, 2016, 04:21 PM IST
प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

मुंबई : भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.

भारतीय टीममध्ये ओपनिंग जोडी आतापर्यंत काही चांगलं करु शकलेली नाही. रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्यावर अवलंबून असणं हे भारतीय टीमसाठी थोडं अवघडच आहे. तरी देखील अजिंक्य रहाणेला संधी देत नसल्याने अनेक जण नाराज आहेत. युवराज सिंग हा दुखापतीमुळे टीममधून बाहेर झाला आहे त्यामुळे आता तरी रहाणेला संधी मिळेल अशी अनेकांना आशा आहे.

प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात ही टीम सेमीफायनल आणि फायनलसाठी असावी. असं प्रत्येकाला वाटत असेल.

पाहा कशी असावी भारतीय टीम

रोहित शर्मा
अजिंक्य रहाणे
विराट कोहली
सुरेश रैना
मनीष पांडे
महेंद्रसिंग धोनी
हार्दिक पांड्या
रविंद्र जडेजा
आर. अश्विन
जसप्रीत बुम्रा
आशिष नेहरा