मुंबई : उरुग्वे आणि कोलम्बियामधील रंगतदार मुकाबल्याची ट्रीट फुटबॉल चाहत्यांना मिळणार आहे. दोन्ही टीम्स आपल्या स्टार स्ट्रायकरविना मैदानात उतरणार आहेत. लुईस सुआरेझ खेळणार नसल्यानं उरुग्वेच्या टीमला मोठा फटका बसलाय. त्यामुळे जी टीम आपल्या स्ट्रायकरविना सर्वोत्तम खेळ करेल तिच टीम क्वार्टर फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी होईल.
लुईस सुआरेझला उरुग्वेच्या टीमसाठी आपलं योगदान द्यायचं होतं तर ते मैदानावर गोल झळकावून द्यायला हवं होतं. मात्र, फुटबॉलच्या दुनियेतील या सबसे बड्या व्हिलननं इटालियन टीमच्या फुटबॉलरचा चावा घेतला. आणि उरुग्वेन टीमच्या अडचणीच अधिकच वाढवल्या. सुआरेझवर फिफानं 9 मॅचेस आणि चार महिन्यांच्या बंदीची कारवाई केली.
नॉक आऊट राऊंडमध्ये उरुग्वेन टीमला सुआरेझविना मैदानात उतरावं लागणार आहे. सुआरेझचं प्रकरण विसरुन त्यांच्या टीमला वर्ल्ड कपच्या नॉक आऊट राऊंडमध्ये कोलम्बियाशी दोन हात करावे लागतील. उरुग्वेप्रमाणे कोलम्बियन टीमलाही स्ट्रायकर राडमेल फाल्कोविना खेळावं लागेल. कोलम्बियानं आपल्या तिन्ही मॅचेस जिंकत दिमाखात टॉप 16 मध्ये प्रवेश केलाय. तर उरुग्वेची टीमची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. सुआरेझ नसल्यामुळे उरुग्वेची भिस्त एडीन्सन कवानी आणि दिएगो फोरलानवर असेल तर कोलम्बियन टीमला जेम्स रॉड्रीगेज आणि मारियो येप्सकडून मोठ्या अपेक्षा असतील. रॉड्रीगेजनं कोलम्बियासाठी सर्वाधिक गोल या वर्ल्ड कपमध्ये झळकावले आहेत.
1962 नंतर पहिल्यांदाच या दोन्ही टीम्स आमने-सामने येतायत. 1962 च्या वर्ल्ड कप मॅचमध्ये उरुग्वेनं कोलम्बियावर 2-1 नं मात केली होती. आघाडी घेऊनही कोलम्बियाला मॅच जिंकता आली नव्हती. वर्ल्ड कपच्या इतिहासात कोलम्बियानं टॉप 16 मध्ये दुसऱ्यांदाच प्रवेश मिळवलाय. आता उरुग्वेला पराभूत करत कोलम्बियाला क्वार्टर फायनलमध्ये पहिल्यांदाच प्रवेश मिळवण्याची नामी संधी आहे. सुआरेझ नसल्याची मोठी किंमत पहिल्याच मॅचमध्ये उरुग्वेला मोजावी लागली होती. उरुग्वेला कोस्टा रिकाकडून 3-1 नं पराभव सहन करावा लागला होता. आता सुआरेझ चापटर क्लोज करून उरुग्वेची टीम टॉप 8 मध्ये धडक मारण्यास यशस्वी ठरते का ते पाहणं, महत्त्वाचं ठरणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.