फिफा 2014 : ब्राझील विरुद्ध चिली प्रीव्ह्यू

यजमान ब्राझिलियन टीमला चिलीच्या आव्हानाचा नॉक आऊट राऊंडमध्ये सामना करावा लागणार आहे. थियागो सिल्व्हाची टीमचं विजयासाठी हॉट फेव्हरिट आहे. मात्र, चिलीनं माजी वर्ल्ड चॅम्पियन स्पेनला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे एखाद्या अनपेक्षित निकालही या मॅचमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 28, 2014, 09:18 AM IST
फिफा 2014 : ब्राझील विरुद्ध चिली प्रीव्ह्यू title=

मुंबई : यजमान ब्राझिलियन टीमला चिलीच्या आव्हानाचा नॉक आऊट राऊंडमध्ये सामना करावा लागणार आहे. थियागो सिल्व्हाची टीमचं विजयासाठी हॉट फेव्हरिट आहे. मात्र, चिलीनं माजी वर्ल्ड चॅम्पियन स्पेनला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे एखाद्या अनपेक्षित निकालही या मॅचमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

2000 च्या वर्ल्ड कप क्वालिफायर्समध्ये ब्राझिलला चिलीकडून मात खावी लागली होती तर डिफेन्डिंग चॅम्पियन्स स्पेनला गाशा गुंडाळायला भाग पाडणाऱ्या चिलीपासून ब्राझिलला सावध रहावं लागणार आहे. ब्राझिलचे बॉस लुईस फेलिपे स्कोलारी यांनीही ज्यावेळी वर्ल्ड कपचा ड्रॉ जाहीर झाला होता. त्यावेळी चिलीनं टॉप 16 साठी क्वालिफाय होऊ नये असं मत व्यक्त केलं होतं.

ब्राझिलनं क्रोएशिया आणि कॅमेरूनचा पराभव करत टॉप 16 मध्ये प्रवेश केलाय. तर चिलीनं स्पेन आणि ऑस्ट्रेलियावर मात करत नॉकआऊट राऊंडमध्ये प्रवेश मिळवलाय. ब्राझील आणि चिलीमध्ये झालेल्या गेल्या 12 मॅचेसमधील 10 मॅचेसमध्ये ब्राझिलयन टीमनं विजय मिळवलाय. त्यामुळे सांबा टीमचचं पारडं या मॅचमध्ये जड आहे. त्यातच ब्राझिल आणि चिली वर्ल्ड कपमध्ये ज्या-ज्यावेळी आमेन-सामने आलेत त्या-त्यावेळी ब्राझिलियन टीमनचं बाजी मारली आहे. ब्राझील आणि चिलीमध्ये आतापर्यंत वर्ल्ड कपच्या तीन मॅचेस झाल्या आहेत. या तिन्ही मॅचेसमध्ये सांबा टीम विजयी झाली आहे. इतिहास ब्राझिलियन टीमच्या बाजूनं आहे. त्यामुळे चिलीच्या टीमला थियागो सिल्व्हाच्या टीमवर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.

नेमार हा ब्राझिलियन टीमचा गोल्डन बॉय तुफान फॉर्मात आहेत. त्याला रोखण्याचं मोठ आव्हान चिलिच्या टीमसमोर असेल. पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये त्यानं आपल्या कामगिरीनं सा-यांनाच आश्चर्यचकीत केलंय. ब्राझिलच्या टीममध्ये काही बदल अपेक्षित आहेत. दरम्यान, ब्राझिलचा कमकुवत डिफेन्स लीग मॅचेसमध्ये दिसून आलाय. त्यातच चिलीची टीम आक्रमक फुटबॉल खेळते. टेक्निकली गिफ्टेड प्लेअर्स त्यांच्या टीममध्ये आहेत. त्यामुळे ब्राझिलला आपल्या खेळात कमालीची सुधारणा करावीच लागणार आहे.

दरम्यान, यजमान टीमला रेफ्रींचा सपोर्ट मिळतोय. त्यामुळे चिलीच्या गोटात चितेंचं वातावरण आहे. आता क्लिअरकट फेव्हरिट असलेली ब्राझिलियन टीम आपला चिलीविरुद्धचा अनबिटन रेकॉर्ड कायम राखते. की, चिली यजमानांना पराभवाचा धक्का देत वर्ल्ड कपमध्ये आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद करते याकडेच फुटबॉलप्रेमींच लक्ष असेल.

 

नेमार ब्राझिलियन टीमचा गोल्डन बॉय...

नेमारचा गोल धडाका लीग मॅचेसमध्ये फुटबॉलप्रेमींना पाहाला मिळाला. लीग मॅचेसमध्ये त्यानं तब्बल चार गोल केले आहेत. नेमारचा हा पहिला वर्ल्ड कप आहे. आणि आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये नेमारनं आपली वेगळी छाप सोडली. ब्राझिलियन टीमचा तो प्रमुख आधारस्तंभ आहे. त्यामुळे धोकादायक चिलीविरुद्धच्या मॅचमध्ये नेमारचा जलवा फुटबॉल चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार अशी अपेक्षा आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.