close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसिम अक्रमवर गोळीबार

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसिम अक्रमवर गोळीबार करण्यात आला आहे. वसिम अक्रमच्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला, यात वसिम अक्रम बचावला असल्याचं सांगण्यात येत आहे. वसिम अक्रमवर गोळीबार का करण्यात आला याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

Updated: Aug 5, 2015, 05:47 PM IST
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसिम अक्रमवर गोळीबार

कराची : पाकिस्तान टीमचा माजी कप्तान वसिम अक्रमवर गोळीबार करण्यात आला आहे, या गोळीबारात वसिम अक्रम बचावला आहे. कराचीतील नॅशनल स्टेडीयमजवळ कार पार्क केल्यानंतर वसिमच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. 

मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी हा गोळीबार केला, वसिम अक्रमने या मोटरसायकलचा नंबर नोट करून पोलिसांना दिला आहे, पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. वेगवान बॉलर्सना बॉलिंगविषयी धडे देण्यासाठी वसिम अक्रम नॅशनल स्टेडियमला जात असतांना ही घटना घडली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.