IPL : गौतम गंभीरने तोडला सुरेश रैनाचा अर्धशतकांचा रेकॉर्ड

कोलकाता नाईटराईडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने काल चांगली खेळी केली मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांना जिंकता आले नाही. गौतम गंभीरने अर्धशतक केल्यानंतर सुरेश रैनाचा आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतकांचा रेकॉर्ड मोडला. गंभीरने ५२ रन्स करताना ४ चौकार आणि १ षटकार ठोकला.

Updated: Apr 14, 2016, 05:35 PM IST
IPL : गौतम गंभीरने तोडला सुरेश रैनाचा अर्धशतकांचा रेकॉर्ड title=

कोलकाता : कोलकाता नाईटराईडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने काल चांगली खेळी केली मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांना जिंकता आले नाही. गौतम गंभीरने अर्धशतक केल्यानंतर सुरेश रैनाचा आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतकांचा रेकॉर्ड मोडला. गंभीरने ५२ रन्स करताना ४ चौकार आणि १ षटकार ठोकला.

गंभीरने मनीष पांडे (२९ बॉलमध्ये ५२ रन्स केलेत) याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १०० रन्सची भागिदारी केली. गंभीरने दोन सामन्यात मिळून शानदार १०२ रन्स केल्यात. त्याचवेळी त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक केल्याने सुरेश रैनाचा २७ अर्धशतकांचा रेकॉर्ड मोडला. आता आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकण्याचा रेकॉर्ड गौतम गंभीरने आपल्या नावावर केलाय.

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना सुरेश रैनाने २६ अर्धशतके ठोकली होती. आता तो गुजरात लायन्सकडून खेळत आहे.

हे आहेत आता सर्वाधिक अर्धशतक करणारे ५ खेळाडू  

१: गौतम गंभीर (दिल्ली डेयरडेविल्स, कोलकाता नाइट राइडर्स) - २७ अर्धशतक
२ : सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स) - २६ अर्धशतक
३ : डेविड वार्नर (दिल्ली डेयरडेविल्स, हैदराबाद)-  २६ अर्धशतक
४ : रोहित शर्मा (डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स) - २५ अर्धशतक
५ : शिखर धवन (डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेयरडेविल्स, मुंबई इंडियन्स, हैदराबाद) - २१ अर्धशतक