आयपीएलमध्ये गंभीरला मिळाली ऑरेंज कॅप

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली पहिली ऑरेंज कॅप पटकवण्याचा मान कोलकता नाईटरायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीरला मिळाला आहे.

Updated: Apr 13, 2016, 10:06 PM IST
आयपीएलमध्ये गंभीरला मिळाली ऑरेंज कॅप

कोलकाता: आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली पहिली ऑरेंज कॅप पटकवण्याचा मान कोलकता नाईटरायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीरला मिळाला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला ही कॅप दिली जाते. 

गंभीरनं आत्तापर्यंत 2 मॅचमध्ये 102 रन बनवल्या आहेत. मुंबई विरुद्धच्या मॅचमध्ये गंभीरनं 52 बॉलमध्ये 64 रन केल्या. 

सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या या यादीमध्ये बंगलोरचा एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या तर बंगलोरचाच विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.