वॉशिंग्टन : अलिसिया मोंटानो ही आठ महिन्याची गरोदर महिला चक्क 800 मीटरच्या रेसमध्ये धावली. अलिसिया मोंटानो ही पाच वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली आहे. अलिसिया मोंटानो जेव्हा मैदानात धावली तेव्हा क्रीडा रसिक पाहून थक्क झाले.
मोंटानोने पहिल्या मुलाच्यावेऴी 7 महिन्याची गरोदर असताना 2 मिनिटे आणि 32 सेकंदामध्ये रेस पूर्ण केली होती. मोंटानो रेसमध्ये सर्वात मागे राहिली होती, मात्र तीने रेस पूर्ण केली होती.
मोंटानोने या वेळच्या रेसमध्ये ट्रॅकवरचा पहिला लॅप पूर्ण केला आणि उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाट केला. मोंटानो रेसच्या मैदानातील एक-एक लॅप पूर्ण करत होती, आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढत होती. यावेळी मोंटानोच्या नावाने घोषणाही दुमदुमत होत्या.
कोणत्याही परिस्थितीत मला रेस पूर्ण करायची होती आणि मी ती पूर्ण केली, अशी प्रतिक्रिया मोंटानोने दिली. तीच्या या जिद्दीचं समस्त अॅथलॅटीक विश्वातून कौतुक होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.