ग्लासगो : स्कॉटलंडमधील प्रसिद्ध ग्लासगो सेल्टिक फुटबॉल क्लबवर रात्री 20 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांचं उद्धाटन झालं.
राणी एलिझाबेथ दुसरी यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात दोन हजार कलाकार सहभागी झाले. ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक रॉड स्टीवर्ट, सुसान बॉयले, एमी मॅकडोनल्ड आणि ज्युली फॉलिस यांच्या अदाकारीन प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात क्रीडा, संस्कृती आणि शिस्तीचा अनोखा मिलाफ पहायला मिळाला. गतवेळच्या स्पर्धेचा आयोजक म्हणून या समारंभात भारताला परेडच्या नेतृत्त्वाचा मान मिळाला.
भारताचा अव्वल शूटर विजय कुमार हा यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा फ्लॅग बेअरर होता. भारतीय कॉमनवेल्थ पथकामध्ये 224 अॅथलिट्सचा समावेश आहे.
जॅक मॉर्टन वल्डवाइड या कंपनीकडे या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारत आज कुठल्या गेम्समध्ये सहभागी होणार आहे. त्यावर एक नजर टाकूया...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.