लॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची तेंडुलकरने केली होती भविष्यवाणी

 भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारत लॉर्ड्स टेस्ट जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली होती. सचिनने या संदर्भात सांगितले की, मी भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावरच सांगितले.

Updated: Jul 23, 2014, 04:18 PM IST
लॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची तेंडुलकरने केली होती भविष्यवाणी title=

मुंबई :  भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारत लॉर्ड्स टेस्ट जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली होती. सचिनने या संदर्भात सांगितले की, मी भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावरच सांगितले.

सचिन तेंडुलकर त्यावेळी लंडनमध्ये होता, त्यावेळी आपल्या मुलासह त्याने पहिल्या दिवसाचा खेळ पाहिला. तरूण संघाच्या शानदार प्रदर्शनामुळे संपूर्ण देशाचे मनोधर्य वाढविले.  

मी खूप खूष आहे, खूप शानदार प्रदर्शन होते. जेव्हा टेस्ट मॅच सुरू झाली तेव्हा मी पहिल्या दिवशी लंडनमध्ये होतो. तेव्हा पहिल्या दिवसाचा खेळ पाहिला आणि माझा मुलगा अर्जुनला सांगितले, आपलं पारडं जड आहे. इंग्लडचा संघाने चांगली फलंदाजी केली. तर त्यांच्याकडे संधी आहे, नाही तर आपणच ही टेस्ट जिंकणार आहोत, असे सचिनने सांगितले.

मला आनंद वाटतो की मी व्यक्त केलेले भाकीत खरे ठरले. कारण संपूर्ण देश या सिरीजमध्ये आघाडी घेण्यासाठी उत्सुक होता. भारताने दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लडला ९५ धावांनी पराभूत केले आणि सिरीजमध्ये १-० मध्ये आघाडी घेतली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.