गुजरातचा कोलकत्यावर 6 विकेट्सनी विजय

आयपीएलच्या कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.

Updated: May 19, 2016, 11:32 PM IST
गुजरातचा कोलकत्यावर 6 विकेट्सनी विजय title=

कानपूर: आयपीएलच्या कोलकता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून गुजरातनं कोलकत्याला पहिले बॅटिंगला पाठवलं. 

कोलकत्याला 20 ओव्हरमध्ये फक्त 124 रनच बनवता आल्या. युसुफ पठाणनं सर्वाधिक 36 बॉलमध्ये 36 रन बनवल्या. तर गुजरातच्या ड्वॅन स्मिथनं 4 ओव्हरमध्ये फक्त 8 रन देऊन कोलकत्याच्या 4 विकेट घेतल्या. 

125 रनचा पाठलाग करायला आलेल्या गुजरातची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. बॉलिंगमध्ये चमकदार कामगिरी करणारा स्मिथ पहिल्याच बॉलला आऊट झाला, तर मॅक्कलमही तीन रनवर आऊट झाला. त्यानंतर सुरेश रैनानं केलेल्या हाफ सेंच्युरीमुळे गुजरातचा डाव सावरला आणि त्यांना विजय मिळाला. 

या विजयामुळे गुजरात 13 मॅचमध्ये 16 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलंय. तर 12 मॅचमध्ये 16 पॉईंट्ससह सनरायजर्स हैदराबाद पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे, आणि पॉईंट्स टेबलमधली चुरसही आता वाढली आहे. 

बैंगलोर, कोलकाता आणि मुंबई या तिन्ही टीमचे 13 मॅचमध्ये 14 पॉईंट्स झाले आहेत. त्यामुळे या तिन्ही टीम अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. तर दिल्लीचे 12 मॅचमध्ये 12 पॉईंट्स आहेत. त्यामुळे आता या टीमना मॅच मोठ्या फरकानं जिंकून नेट रन रेट तर सुधारावा लागणारच आहे. त्यातच इतर टीमच्या कामगिरीवरही या टीमचं प्ले ऑफला पोहोचणं अवलंबून असणार आहे.