पुन्हा परदेशी कोच की स्वदेशीला संधी?

टीम इंडियावर गेल्या 15 वर्षांपासून परदेशी कोचच वर्चस्व पाहायला मिळालंय. आता डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपत असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यात पुन्हा परदेशी कोच मिळणार का स्वदेशी व्यक्तीला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Updated: Apr 6, 2015, 07:05 PM IST
पुन्हा परदेशी कोच की स्वदेशीला संधी?  title=

मुंबई : टीम इंडियावर गेल्या 15 वर्षांपासून परदेशी कोचच वर्चस्व पाहायला मिळालंय. आता डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपत असून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यात पुन्हा परदेशी कोच मिळणार का स्वदेशी व्यक्तीला संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

2000 ते 2005 पासून जॉन राईट यांनी टीम इंडियाला मार्गदर्शन केलं. यानंतर ग्रेग चॅपेल आले त्यांचा कार्यकाळ केवळ दोन वर्षांसाठीचा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजयापेक्षा टीम इंडियामध्ये वादच अधिक झाले.

2007 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पराभूत होऊन मायदेशी परतेल होते. चॅपेल यांचं सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरबरोबर अजिबात पटलं नाही. यानंतर 2007 मध्ये गॅरी कर्स्टन यांच्याकडे भारतीय टीमची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात भारतीय टीम सर्वाधिक यश मिळालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन झाली आणि टेस्टमधअये बेस्टही झाली. 

कर्स्टननंतर डंकन फ्लेचर यांच्याकडे टीम इंडियाच्या कोचची सूत्र सोपविण्यात आली. त्यांचा करार आता संपलाय. आता प्रश्न हा उपस्थित होतोय की, अखेर आता टीम इंडियाला भारतीय कोच मिळतो की पुन्हा एकदा भारतीय टीमची धुरा एका परदेशी प्रशिक्षकाकडे जाते.
.............

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.