हाशिम आमलानं तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड!

दक्षिण आफ्रिकन बॅट्समन हाशिम आमलानं वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडलाय. ऑस्ट्रेलिया विरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरिजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये आमलानं वनडे करिअरची १७वी सेंच्युरी करून सर्वात कमी मॅचमध्ये १७वी सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय.

Updated: Nov 20, 2014, 09:55 AM IST
हाशिम आमलानं तोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड!  title=

मुंबई: दक्षिण आफ्रिकन बॅट्समन हाशिम आमलानं वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडलाय. ऑस्ट्रेलिया विरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरिजमध्ये तिसऱ्या मॅचमध्ये आमलानं वनडे करिअरची १७वी सेंच्युरी करून सर्वात कमी मॅचमध्ये १७वी सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय.

आमलाच्यापूर्वी हा रेकॉर्ड कोहलीच्या नावावर होता. कोहलीनं १७वी वनडे सेंच्युरी ११२व्या मॅचमध्ये केली. तर आमलानं हा कारनामा ९८व्या मॅचमध्येच करून दाखवलाय. हा एक योगायोगच म्हणावा लागेल कोहलीनंही हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच मॅचमध्ये केला होता. ऑक्टोबर २०१३मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहलीनं १७वी सेंच्युरी करून सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडला होता. गांगुलीनं १७वी वनडे सेंच्युरी १७०व्या मॅचमध्ये पूर्ण केली होती. या लिस्टमध्ये आता आमला सर्वात वर पोहोचलाय. 

त्यानंतर कोहली (११२ मॅच), एबी डिव्हिलियर्स (१५६ मॅच), सौरवा गांगुली (१७० मॅच), सईद अनवर (१७७ मॅच) आणि क्रिस गेल (१८२ मॅच) या क्रमानं आहे. आमलानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११५ बॉल्समध्ये १०२ रन्स केले. त्यात त्यानं ९ चौकार लगावले.  
आमलाचीही सेंच्युरी त्याच्यासाठी फायद्यासाठी ठरली असली तरी टीमनं मात्र मॅच गमावली. ऑस्ट्रेलियानं ही मॅच ७३ रन्सनी जिंकली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.