हार्टब्रेकर, अखेरच्या मिनिटात गोल करून जर्मनीचा भारतावर विजय

 रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात अखेरचे तीन सेकंद उरले असताना जर्मनीने गोल करून भारताला पराभूत केले. 

Updated: Aug 8, 2016, 09:49 PM IST
हार्टब्रेकर, अखेरच्या मिनिटात गोल करून जर्मनीचा भारतावर विजय

रिओ :  रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात अखेरचे तीन सेकंद उरले असताना जर्मनीने गोल करून भारताला पराभूत केले. 

जर्मनीने दुसऱ्या सेशनमध्ये १७ व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर भारताने पेनल्टी कॉर्नरद्वारे रुपिंदर पाल सिंग याने २२ व्या मिनिटाला गोल केला. 

तिसरा आणि चौथं सेशन बरोबरी कायम होती. पण सामना संपायला तीन सेकंद उरले असताना जर्मनीने हल्लाबोल करत भारताचा गोलपोस्ट भेदला आणि २-१ असा अखेरच्या क्षणी विजय मिळविला. या विजयामुळे भारताला खूप मोठा धक्का बसला आहे. 

भारताने हा सामना बरोबरीत सोडला असता तर त्याला फायदा झाला असता.