मेलबर्न : आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी आज विश्वविजेत्या टीमला आपल्या हाताने ट्रॉफी दिली. नियमानुसार अशा मोठ्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना ट्रॉफी अध्यक्षांच्या हस्ते दिली जाते. मात्र श्रीनिवासन यांनी आयसीसी अध्यक्ष मुस्तफा कमाल यांना ट्रॉफी देण्यापासून रोखलं आहे.
मुस्तफा कमाल यांनी क्वार्टल फायनलमध्ये भारताने बांगलादेशला पराभूत केल्यानंतर, त्या मॅचमध्ये पक्षपात झाल्याचा आरोप केला होता. याच बद्दल श्रीनिवासन नाराज असल्याचे बोलले जात होते.
मेलबर्नमध्ये झालेल्या आयसीसीच्या सदस्यांच्या बैठकीमध्ये विजेत्या टीमला ट्रॉफी आपल्या हाताने देण्याचा निर्णय श्रीनिवासन यांनी घेतला होता.
आयसीसीच्या नियमानुसार विजेत्या टीमला ट्रॉफी अध्यक्षांच्या हस्ते दिली जाते. हा निर्णय 1997-2000 साली जगमोहन दालमिया अध्यक्ष असतांना घेण्यात आला होता. आयसीसी अध्यक्षांनी1999 च्या वर्ल्ड कपमध्ये विजेत्या टीमला पहील्यांदा ट्रॉफी दिली होती.
श्रीनिवासन आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचा मुस्तफा कमाल यांनी आरोप केला आहे.
मुस्तफा कमाल यांनी भारत-बांगलादेश मॅचनंतर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण मागितलले होते. त्यावेळी आयसीसीचा अध्यक्ष म्हणून हे माझं मत नाही, तर हे माझं व्यक्तिगत मत आहे असं मुस्तफा यांनी स्पष्टीकरण करण दिलं होत. या स्पष्टीकरणने आयसीसीच्या कोणत्याही सदस्यांचे समाधान झाले नव्हते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.