टेस्ट रॅंकिंगमध्ये भारताची चौथ्या स्थानी झेप

आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये भारतानं चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताला टेस्ट रॅंकिंगमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खराब कामगिरिचा फायदा झाला आहे. 

Updated: May 12, 2015, 04:41 PM IST
टेस्ट रॅंकिंगमध्ये भारताची चौथ्या स्थानी झेप title=

दुबई: आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये भारतानं चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताला टेस्ट रॅंकिंगमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या खराब कामगिरिचा फायदा झाला आहे. 

सोमवारी प्रसारित केलेल्या यादीत ९९ अंकासह भारत चौथ्या स्थानी आहे. तर १३० अंकासह दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानी आहे. १०८ अंकासह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानवर आहे. बांग्लादेशविरुद्ध टेस्ट सिरिज १-० अशी जिंकून देखील पाकिस्तानची तीन स्थानांनी घसरण झाली असून, ९७ अंकासह सहाव्या स्थानवर पाकिस्तान पोहचला आहे. इंग्लड ९७ अंकासह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड ९९ अंकासह तिसऱ्या स्थानावर आहे. 

तिसऱ्या स्थानावरील न्यूझीलंड आणि सातव्या स्थानावरील श्रीलंका यांच्या फक्त तीन अंकांचा फरक आहे. येणाऱ्या काही दिवसात यामध्ये चढ-उतार दिसू शकतो. ३९ अंकासह बांगलादेश क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे, तर पांच अंकासह झिम्बाब्वे शेवटच्या स्थानावर आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.