आज भारत-श्रीलंका पहिली वन-डे

भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.

Updated: Nov 2, 2014, 10:04 AM IST
आज भारत-श्रीलंका पहिली वन-डे  title=

कटक: भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.

दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे. दरम्यान ड्यू फॅक्टर या मॅचमध्ये निर्णायक ठरणार आहे. आता नवा कॅप्टन कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयी सलामी देते का ते पहाण महत्वाचं ठरणार आहे.  

श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजमधून टीम इंडिया वर्ल्डकपची तयारी करतेय. भारतीय संघाला प्रभारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आपल्या युवा खेळाडूंची क्षमता तपासून पाहण्याची संधी मिळाली आहे. नियमित कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पाच सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या तीन वन-डे सामन्यांत विश्रांती देण्यात आली आहे. 

बोर्डासोबत मानधनाच्या मुद्दय़ावर झालेल्या वादामुळे गेल्या महिन्यात वेस्ट इंडीज संघाने मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं तातडीने श्रीलंकेसोबत मालिका आयोजित करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघ लसिथ मलिंगा, सुरांगा लकमल, अजंता मेंडिस आणि रंगना हेराथ यांच्याविना भारतात दाखल झाला आहे. मलिंगा आणि लकमल दुखापग्रस्त असून फिरकीपटू मेंडिस आणि हेराथ उपलब्ध नाहीत. 

कोण-कोण आहेत टीममध्ये...

भारत :  विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, वरुण अॅरोन, अक्षर पटेल, शिखर धवन, रिद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणो, सुरेश रैना, अंबाती रायडू, अमित मिश्र व धवल कुलकर्णी.

श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा, कुमार संघकारा, माहेला जयवर्धने, अशन प्रियंजन, निरोशन डिकवेला, थिसारा परेरा, नुवान कुलशेखरा, धम्मिका प्रसाद, लाहिरू गमागे, चतुरंगा डिसिल्वा, सिकुगे प्रसन्ना व सूरज रंधीव.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.