चेन्नई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचा खराब फॉर्म कायम आहे. तसेच त्याला भाग्यही साथ देताना दिसत नाही. दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारताचा डाव १३५ धावांवर गुंडाळण्यात ऑस्ट्रेलिया अ संघाला यश मिळाले आहे.
भारताच्या अ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजारा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघाने ६८.५ ओव्हर गोलंदाजी केली. त्यात विशेष म्हणजे कोहलीला टाकलेल्या ४२ चेंडूत त्याने संघर्ष करताना केवळ १६ धावा काढल्या.
भारताला प्रत्युतर देताना ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने १३ षटकात बिन बाद ४३ धावा काढल्या. कॅमरून बॅनक्रॉफ्ट २४ आणि उस्मान ख्वाजा १३ धावांवर फलंदाजी करीत आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून फॉस्ट बॉलर गुरविंदर सिंग संधू याने २५ धावा देत ३ विकेट घेतल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.