मुंबई: इंग्लंडमध्ये वनडे सीरिजपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं कोच डंकन फ्लेचर यांची स्तुती केलीय. धोनीनं म्हटलं की, फ्लेचरच टीमचे बॉस आहेत आणि ते 2015 वर्ल्डकपपर्यंत टीमचे बॉसच असतील.
टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर टीम इंडिया आज ब्रिस्टलमध्ये इंग्लंडविरोधात पाच मॅचेसच्या वनडे सीरिजची पहिली मॅच खेळणार आहे. फ्लेचर यांच्या भूमिकेबाबत कयास लावले जात असतांना, धोनीनं फ्लेचर यांना बॉस म्हणून या विषयावर पूर्णविराम लावलाय.
टेस्ट सीरिजमध्ये 1-3 असा पराभव झाल्यानंतर भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये आमुलाग्र बदल झाले. बॉलर्सचे कोच डावेस आणि फिल्डिंग सल्लागार ट्रेवर पेनी यांना सुट्टी देण्यात आलीय. तर रवी शास्त्री यांना टीमचे डायरेक्टर बनवण्यात आलंय.
धोनीनं पत्रकार परिषदेत सांगितलं, ‘आमच्या सोबत रवी शास्त्री आहेत, जे प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवतील. मात्र फ्लेचर बॉस आहेत. असं नाहीय की फ्लेचर यांचे अधिकार कमी केले गेलेत. बाहेरचं माहित नाही पण टीममध्ये पहिलेसारखंच काम सुरू आहे. आता ड्रेसिंग रूममध्ये आणखी स्टाफ आलाय, पण काम पहिलेसारखंच सुरू आहे.’
मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले की, फ्लेचर यांच्यासह नवीन कोचिंग स्टाफला वनडे सीरिज दरम्यान त्यांना रिपोर्ट करावं लागेल. डावेस आणि पेनी यांना काढल्यानंतर माजी भारतीय ऑलराऊंडर संजय बांगड आणि माजी फास्ट बॉलर भरत अरुण यांना सहाय्यक कोच तर श्रीधर यांना फिल्डिंग कोच म्हणून टीममध्ये घेण्यात आलंय. धोनीनं मात्र सांगितलं की, शास्त्री यांची भूमिका मॅनेजर सारखी असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.