कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारताचा धावांचा डोंगर

कॅनडाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना ५० षटकांत तब्बल ४८५ धावा ठोकल्या. १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताने हा इतका मोठा स्कोर केलाय. 

Updated: Jan 23, 2016, 03:02 PM IST
कॅनडाविरुद्धच्या सामन्यात भारताचा धावांचा डोंगर title=

सावर : कॅनडाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना ५० षटकांत तब्बल ४८५ धावा ठोकल्या. १९ वर्षाखालील वर्ल्डकपच्या सराव सामन्यात भारताने हा इतका मोठा स्कोर केलाय. 

कर्णधार इशान किशनने १६ चौकार आणि सात षटकांरांसह ८६ चेंडूत १३८ धावांची तुफान खेळी केली. मात्र दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. इशानने जबरदस्त सलामी दिल्यानंतर रिषभ पंतनेही ३७ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ६२ धावा केल्या. इशांत आणि पंतव्यतिरिक्त रिकी भुईनेही चांगली कामगिरी केली. 

भुईने दमदार खेळी करताना १० चौकार आणि सात षटकारांसह खणखणीत शतक लगावले. याशिवाय सरफराज खान(४८), अरमान जाफर(३६) आणि महिपाल लोमरोर (५५) यांनी केलेल्या खेळीमुळे संघाला साडेचारशेहून अधिक धावांचा टप्पा गाठता आला.