जूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर!

भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे. 

Updated: May 5, 2015, 05:43 PM IST
जूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर! title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे. 

बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया ७ जून रोजी बांग्लादेश सीरिजसाठी रवाना होणार आहे. पहिली टेस्ट मॅच १० जून पासून सुरू होईल. ही मॅच फतुल्लाहमध्ये खेळली जाईल. तब्बल नऊ वर्षांनंतर या मैदानावर टेस्ट मॅच रंगणार आहे, हे विशेष.

टीम इंडियाला यानंतर मीरपूरमध्ये १८, २१ आणि २४ जून रोजी तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मॅच खेळायच्यात. टीम २६ जून रोजी भारतासाठी रवान होईल. जून महिन्यात पावसाच्या संभावनेमुळे सर्वच एकदिवसीय मॅचेससाठी रिझर्व्ह दिवस ठेवले गेलेत. 

पावसाच्या कारणास्तव बांग्लादेशनं कधीही जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात टेस्ट मॅचस आपल्या देशात खेळवल्या नाहीत. परंतु, यावेळी भारताविरुद्ध श्रृंखलेनंतर बांग्लादेश जुलै-ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी यजमानपदही भूषविणार आहे. 

बांग्लादेश सध्या पाकिस्तानसाठी यजमानपद भूषवतंय. बांग्लादेश टीमनं वनडे मॅच श्रृंखलेमध्ये ३-० पासून क्लीनस्वीप केल्यानंतर एकमात्री टी-२० मॅचही जिंकलीय. दोन्ही टीम्समध्ये टेस्ट श्रृंखलेतील पहिली मॅच ड्रॉ झाली. 
 
बांग्लादेश दौऱ्यासाठी असा आहे टीम इंडियाचा कार्यक्रम... 

  • ७ जून : टीम इंडिया बांग्लादेशात पोहचणार

  • १० ते १४ जून - पहिली टेस्ट मॅच

  • १८ जून - पहिली वन डे

  • १९ जून - रिझर्व्ह दिवस

  • २१ जून - दुसरी वन डे

  • २२ जून - रिझर्व्ह दिवस

  • २४ जून - तिसरी वन डे

  • २५ जून - रिझर्व्ह दिवस

  • २६ जून - भारतीय टीम स्वदेशासाठी रवाना होईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.