भारत Vs इंग्लंड : पहिल्या इनिंगमध्ये इंग्रजी बाबू 319 वर ऑल आऊट

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सामन्यात आज इंग्लिश टीम पहिल्या इनिंगमध्ये 319 रन्सवर ऑल आऊट झाली. 

Cricket Country | Updated: Jul 19, 2014, 11:54 PM IST
भारत Vs इंग्लंड : पहिल्या इनिंगमध्ये इंग्रजी बाबू 319 वर ऑल आऊट title=

लंडन : भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सामन्यात आज इंग्लिश टीम पहिल्या इनिंगमध्ये 319 रन्सवर ऑल आऊट झाली. 

बॅलन्सनं 110 रन्सची महत्वपूर्ण इनिंग खेळली तर प्लंकेट 55 रन्सवर नॉटआऊट राहिला. इंग्लिश टीमनं पहिल्या इनिंग 24 रन्सची माफक आघाडी घेण्यात यश आलं. 

भारताकडून भुवनेश्वर कुमारनं सहा विकेट्स घेतल्या. रवींद्र जाडेजानं दोन तर मोहम्मद शमीला एक विकेट घेण्यात यश आलं. इंग्लिश टीमनं दुसऱ्या दिवसाच्या 6 विकेट्स गमावून 219 रन्सवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. 

यामध्ये इंग्लिश टीमला आणखी 100 रन्सची भर घालता आली आणि त्यांची इनिंग अखेर पहिल्या इनिंगमध्ये 319 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यामुळेच भारतीय बॉलर्सना इंग्लंडच्या बॅट्समनना रोखण्यात यश आलं असचं म्हणाव लागेल. 

भुवनेश्वरच्या सहा विकेटस्
भुवनेश्वर कुमारनं लॉर्ड्स टेस्टमध्ये सहा  विकेट्स घेण्याची किमया साधली. त्याच्या टेस्ट करिअरमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

त्याचप्रमाणे लॉर्डसवर एका इनिंगमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा क्रिकेटर ठरला.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.