टी-२० वर्ल्ड कप : पहिल्याच सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव

टीम इंडियासमोर न्यूझीलंडने १२६ रन्सचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंनी हाराकीरी करत संपूर्ण डाव केवळ ७९ रन्सवर आटोपला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारण्यात वेळ आली. ४७ रन्सने पराभव पत्करावा लागला.

Updated: Mar 16, 2016, 07:45 AM IST
टी-२० वर्ल्ड कप : पहिल्याच सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव title=

नागपूर : टीम इंडियासमोर न्यूझीलंडने १२६ रन्सचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र, टीम इंडियाच्या खेळाडूंनी हाराकीरी करत संपूर्ण डाव केवळ ७९ रन्सवर आटोपला. त्यामुळे पहिल्याच सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारण्यात वेळ आली. ४७ रन्सने पराभव पत्करावा लागला.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमस्ने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला टीम इंडियाच्या बॉलरनी चांगली गोलंदाजी केली. अचूक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला २० ओव्हरमध्ये १२६ रन्सवर रोखले. कोरी अँडरसन याने सर्वाधिक ३४ रन्स केल्यात. तर त्यानंतर ल्यूक रोंची (विकेटकीपर) याने २१ रन्स केल्यात. तर टीम इंडियातीलअश्विन, नेहरा, बुमरहा, जडेजा, रैना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 
 
न्यूझीलंडचे माफक आव्हान गाठतानाही भारताच्या नाकी नऊ आले आहेत. केवळ पन्नास धावांच्या आत टीम इंडियाचे ७ खेळाडू तंबूत दाखल झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाची बिकट अवस्था झाली. विराट कोहली २३ रन्सवर आऊट झाला. आघाडीच्या खेळाडूंना दोन अंक धावसंख्या काढता आलेली नाही. कर्णधार धोनीने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ३० रन्सवर आऊट झाल्यानंतर टीम इंडिया झटपट बाद झाली. 

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत ट्वेन्टी-२० क्रिकेटचे पाच सामने खेळले गेले असून, ते सर्व सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.