नवी दिल्ली : न्यायमूर्ती मुकेश मुदगल यांच्या आदेशानुसार दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिकीटाची किंमत कमीतकमी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिनासाठी तिकीटाची किंमत अवघी 10 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
तिकीटांच्या किंमतीबाबत रविवारी डीडीसीए कार्यकारिणीने याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेट बॉक्समधील तिकीटांची किंमत 1000 रुपये ठेवण्यात आली आहे.
तर क्रिकेटप्रेमींसाठी प्रतिदिवसासाठी 100 रुपयांचे तिकीट ठेवण्यात आले आहे. संपूर्ण सत्रासाठी तिकीटाची किंमत 500 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांना हा सामना मोफत पाहण्याची सुविधा असावी असे मुदगल यांनी सांगितले. 15 ते 19 डिसेंबरदरम्यान चौथा कसोटी सामना दिल्लीमध्ये होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.