चेन्नई: विराट कोहलीनं आज गेल्या आठ महिन्यांमध्ये खेळलेल्या वनडेमधील सेंच्युरीची प्रतिक्षा संपवत जबरदस्त सेंच्युरी केली. त्यामुळंच भारतानं आज विजयादशमीच्या दिवशी मॅच जिंकून विजयाचं सोनं लुटलं. ३५ रन्सनं चौथी वनडे मॅच जिंकत भारतानं सीरिजमध्ये २-२ची बरोबरी केलीय.
दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिविलियर्सनं शतकी खेळी खेळली. मात्र तरीही त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
आणखी वाचा - LIVE स्कोअरकार्ड : चौथी वनडे | भारत विरू्ध दक्षिण आफ्रिका
चेपॉकवर सुरु असलेल्या वन-डेमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०० रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. विराट कोहलीनं शानदार सेंच्युरी झळकावली. त्यानं १३८ रन्सची इनिंग खेळली. तर रैनानही हाफ सेंच्युरी केली. रहाणेनं ४५ रन्स केल्या. टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर कोहली आणि रहाणेनं इनिंग सावरली. दोघांनी शतकी पार्टनरशिप केली. तर कोहली आणि रैनानं चौथ्या विकेटसाठी १२७ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. आफ्रिकेकडून डेल स्टेन आणि राबाडानं प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
तर दक्षिण आफ्रिकेकडून डिविलियर्सनं ११२ रन्स केले. तर डेल स्टेन ६१ रन्स आपल्या खात्यात जमा केले. कॅगिसो रबादा ५४ रन्सवर आऊट झाला. स्टेन आणि रबादानं टीम इंडियाच्या प्रत्येकी ३-३ विकेटही घेतल्या. भारताच्या भुवनेश्वर कुमारनं ६८ रन्स देत तीन आणि हरभजन सिंहनं ५० रन्स देत दोन विकेट घेतल्या.
आता सीरिजमधील शेवटची पाचवी वनडे मुंबईत खेळली जाणार आहे.
आणखी वाचा - विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.