पहिल्या टी-२० मध्ये विराट कोहलीने सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का

 इंग्लड विरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ओपनिंगला येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंग्लडने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाकडून आज विराट  आणि राहुल यांची नवीन ओपनिंग जोडी दिसली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 26, 2017, 05:49 PM IST
पहिल्या टी-२० मध्ये विराट कोहलीने सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का  title=

कानपूर :  इंग्लड विरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ओपनिंगला येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंग्लडने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाकडून आज विराट  आणि राहुल यांची नवीन ओपनिंग जोडी दिसली. 

विराटने शानदार फलंदाजी करत २९ धावा केल्या. विराट तिसऱ्यांदा ओपनिंगला उतरला आहे. यापूर्वी २०११ मध्ये टी-२० सामन्यात द. आफ्रिकेविरूद्ध विराट ओपनिंगला आला होता. विराटने त्यावेळी २८ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१२ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध तो ओपनिंगला आला होता. त्यावेळी त्याने ७० धावा केल्या होत्या. विराट यापूर्वी सहा सामन्यात ओपनिंगला आला होता. त्यात त्याने १६१ धावा केल्या आहे. 

विराटची कर्णधार म्हणून पहिली टी -२० 

कोहलीचे कर्णधार म्हणून पहिलीच टी-२०  मॅच आहे. त्याने यापूर्वी २२ टेस्ट आणि २० वन डे सामन्यात भारताचे नेतृत्त्व केला आहे. तीनही फॉर्मटमध्ये कर्णधार झालेला धोनी तिसरा कर्णधार आहे.