मुंबई: आठ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे सीरिजमधील तीन मॅचेससाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. आर. अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त रोहित शर्माऐवजी टीममध्ये अपेक्षेप्रमाणे मुरली विजयला स्थान देण्यात आलंय.
त्याचप्रमाणे कुलदीप या एकमेव नव्या चेहऱ्याला टीममध्ये संधी मिळाली आहे. पहिल्या तीन वन-डे कोच्ची, दिल्ली आणि विशाखापट्टणमध्ये होणार आहेत. ८,११ आणि १४ ऑक्टोबरला या मॅचेस होतील. सीरिजच्या अखेरच्या दोन मॅच धर्माशाला (१७ ऑक्टोबर) आणि कोलकाता (२० ऑक्टोबर)ला असेल.
पाहा कोण आहे भारताच्या वन-डे टीममध्ये:
कॅप्टन महेंद्र सिंह धोनी, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, उमेश यादव, मुरली विजय आण कुलदीप यादव
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.