नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू वरुण आरोन सोमवारी त्याची लहानपणीची मैत्रीण रागिणीशी विवाहबद्ध झालाय. दोघांनी कोर्टात लग्न केलंय. यावेळी वरुण आणि रागिणीचे कुटंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.
त्यानंतर आता ते चर्चमध्ये रितीरिवाजानुसार लग्न करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार फेब्रुवारीला वरुण आणि रागिणी चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न करतील.
वरुण आणि रागिणी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. या दोघांनीही जमशेदपुरच्या लोयाला शाळेत शिक्षण घेतलेय. रागिणी जमशेदपूरच्या कदमा येथे राहते.
टीम इंडियाचा हा स्पीडस्टर वरुण आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळतो. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडूनही खेळला आहे.