विराट कोहलीने केले रहाणेचे असे हाल...

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कोलकतामध्ये जोरदार सराव केला आणि नंतर पार्टीही केली. शनिवारपासून दोन दिवसांचे शिबिरात पहिल्या दिवशी फिटनेस टेस्ट झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे याचा २७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

Updated: Jun 7, 2015, 06:45 PM IST
विराट कोहलीने केले रहाणेचे असे हाल... title=

कोलकता : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कोलकतामध्ये जोरदार सराव केला आणि नंतर पार्टीही केली. शनिवारपासून दोन दिवसांचे शिबिरात पहिल्या दिवशी फिटनेस टेस्ट झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे याचा २७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

भारतीय टीमचे डायरेक्टर रवि शास्त्री यांच्या निर्देशनात १४ सदस्यीय टीमचे फिटनेस टेस्टचे आकलन करण्यात आले. टीमने सायंकाळच्या सेशनमध्ये तब्बल दोन तास ट्रेनिंगमध्ये भाग घेतला. के एल राहुलला डेंग्यू झाल्याने बांग्लादेश दौऱ्यासाठी केवळ १४ सदस्य आहेत. 

दोन वर्षांनंतर टेस्ट संघात सामील झालेल्या हरभजन सिंह याने तसेच दुसऱ्यादा फिटनेस मिळविलेल्या ईशांत शर्माने या फिटनेस टेस्टमध्ये भाग घेतला. या सर्वांनी २० मीटरच्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.

यावेळी रहाणेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रहाणेच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. त्यावळी सहकारी खेळाडूंनी रहाणेच्या चेहऱ्यावर संपूर्ण केक फासला. टेस्टचा कर्णधार कोहलीने एक फोटो ट्विटरवर शेअर केला. रविवारी संपूर्ण संघ सराव करून सोमवारी बांगलादेशला रवाना होणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.