नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा धुवाँधार खेळाडू दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल हे जोडपं आज विवाहाच्या बंधनात अडकणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, कार्तिक आणि दीपिका एकदा नाही तर दोन वेळा विवाह करणार आहे. पहिल्यांदा त्यांचं लग्न ख्रिश्चन पद्धतीनं पार पडेल आणि नंतर हिंदू पद्धतीनं... हिंदू पद्धतीनं म्हणजेच तेलुगु-नायडू स्टाईलनं होणारा विवाहसोहळा २० ऑगस्ट रोजी पार पडेल. या दोन्ही पद्धतीनं होणारा विवाहसोहळा चेन्नईमध्येच पार पडणार आहे.
दीपिका ख्रिश्चन कुटुंबातून आहे तर दिनेश हिंदू परिवारातून... त्यामुळे, हे लग्न दोन्ही पद्धतीनं होणार आहे. दीपिका आणि कार्तिकचा साखरपुडा फेब्रुवारी २०१३ मध्ये पार पडला होता.
कार्तिकचा हा दुसरा विवाह आहे. त्याचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झालाय. २००७ मध्ये कार्तिकनं आपल्या बालपणीची मैत्रिण निकिता हिच्याशी विवाह केला होता. परंतु, एकत्र खेळता-खेळता सुरु झालेलं हे प्रेमप्रकरण लग्नानंतर काही दिवसांतच संपलं. २०१२ मध्ये आपला सहकारी क्रिकेटर मुरली विजय याच्यासोबत निकिताचं अफेअर सुरु असल्यानं कार्तिकचा आणि निकिताचं नातं संपुष्टात आलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.