मुंबई : 2008 मध्ये IPL लाँच झाल्यानंतर क्रिकेट पाहण्याचा अंदाज पूर्णपणे बदलला. मात्र, IPL आणि वाद हे समीकरणच बनलंय ही बाबही नाकारु शकत नाही. जेवढे सीझन तेवढे वाद.. जंटलमन्स गेमला याच IPL नं काळीमा फासण्याचं काम केलं. अर्थातच IPL फिक्सिंगनं...
इंडियन प्रिमियर लीग बोले तो कॅश, क्रिकेट आणि कॉन्ट्रॉवर्सिस... आयपीएलच्या प्रत्येक नव्या सीझनसह जोडला जातो नवा वाद...
2013 IPL सीझन - 6 स्पॉट फिक्सिंगचा 'काळा खेळ'
आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये फिक्सिंगच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी तीन क्रिकेटर्स एस. श्रीशांत , अजित चंडिला आणि अंकित चव्हाणला अटक केली. तिन्ही क्रिकेटपटू हे राजस्थान रॉयल्सचे होते. चौकशीनंतर बीसीसीआयनं या तिन्ही क्रिकेटपटूंवर बंदीची कारवाई केली. तपासाअंतर्गत पुढे अभिनेता विंदू दारासिंग आणि त्यावेळचे बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावाई गुरुनाथ मयप्पन यांचेही सट्टेबाजांशी संबंध असल्याचं उघड झालं. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि मुदगल कमिटीकडे याचा तपास सोपवण्यात आला. यानंतर फिक्सिंग आणि सट्ट्याशी संबधित अनेक नवे खुलासे करण्यात आले. चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टीम्सच्या भविष्यावरही प्रश्न उपस्थित झाले.
2008 IPL सीझन-1 हरभजन-श्रीशांतचा वाद
IPL च्या पहिल्या सीझनपासूनच वादाला सुरुवात झाली. ही दृश्यचं या वादांची साक्ष देतायत... मोहालीमधील मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील मॅचनंतरची ही दृश्य आहेत. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हरभजन सिंगच्या थप्पड की गुंज मैदानाववर ऐकायला मिळाली. आणि यानंतर श्रीशांत मैदानावरच ढसाढसा रडतांना संपूर्ण जगानं पाहिला.
2012 IPL सीझन-5 - पामर्शबॅक बनला व्हिलन
बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सचा क्रिकेटर ल्यूक पामर्शबॅकनं आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये आपल्या खेळानं नाही तर आपल्या बेताल वागण्यानं क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. दिल्ली पोलिसांनी त्याला एका अमेरिकन महिलेची छेडछाड करताना अटक केली.
2010 IPL सीझन - 3 ललित मोदी 'OUT'
आयपीएलला सुपरहिट करणा-य़ा ललित मोदींना आयपीएलच्या तिस-या सीझनच्या प्रेझेंन्टेशन सेरेमनीनंतर लगेचच बर्खास्त करण्यात आलं. मोदींवर कथित आर्थिक घोटाळ्यांचे आरोप लावण्यात आले.
2011 IPL सीझन-4 - कोच्ची टस्कर्स टीम 'OUT'
आयपीएलमध्ये कोच्ची टस्कर्सची सफरच मुळात खराब झाली. टीमवर टर्मस ऑफ ऍग्रीमेंट तोडण्याचे आरोप ठेवण्यात आलेच. शिवया त्यानंतर बँक गॅरंटी पूर्ण न केल्यामुळे टीमला आयपीएलच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.