बंगळुरु : इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या(आयपीएल) आठव्या हंगामासाठी बंगळुरूमध्ये आज ३४४ खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग. त्याच्यावर १६ कोटींची बोली लागली. दिल्लीने १६ कोटी रुपये मोजून युवीला खरेदी केले.
युवराजने २०११ विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. तो मालिकावीर ठरला होता. मात्र २०१५ च्या विश्वचषकात त्याची निवड झाली नव्हती. त्याचा करिष्मा संपल्याची चर्चा होती. मात्र, युवराज सिंग याला दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने तब्बल १६ कोटींच्या मानधनासह संघात घेतले आहे.
कोणाची किती खरेदी?
- युवराज सिंग १६ कोटी - दिल्ली डेअरडेव्हिल्स
- न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट ३.८० कोटी- हैद्राबाद सनरायझर्स
- ऑस्ट्रेलियाचा सीन अॅबॉट १ कोटींसह बंगळुरूसंघात
- भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकट १.१ कोटी- दिल्ली डेअरडेव्हिल्स
- प्रवीण कुमार २.२० कोटी- सनरायझर्स हैदराबाद
- अमित मिश्रा ३.३० कोटी- मुंबई इंडियन्स
- प्रग्यान ओझा ५० लाख- मुंबई इंडियन्स
- फिरकीपटू राहुल शर्मा ३० लाख- चेन्नई सुपरकिंग्ज
- ब्रॅड हॉग ५० लाख- कोलकाता नाईट रायडर्स
यांच्यावर बोली लागलेली नाही
- मुनाफ पटेल आणि झहीर खान यांची खरेदी नाही.
- श्रीलंकेचा दिलशान देखील यांची खरेदी नाही.
- श्रीलंकेच्या जयवर्धने आणि संगकारावर यांची खरेदी नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.