आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ८ प्रमुख शहरांत छापे

आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी ईडीच्यावतीने देशातील ८ प्रमुख शहरात छापे टाकण्यात आले. ईडीला मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमध्ये काही व्यापारी आणि सट्टेबाज मिळून आयपीएल मॅच दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता. 

Updated: May 23, 2015, 06:21 PM IST
आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ८ प्रमुख शहरांत छापे  title=

नवी दिल्ली : आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी ईडीच्यावतीने देशातील ८ प्रमुख शहरात छापे टाकण्यात आले. ईडीला मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमध्ये काही व्यापारी आणि सट्टेबाज मिळून आयपीएल मॅच दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता. 

या माहितीच्या आधारे ही करवाई करण्यात आली. उल्हासनगर मध्ये पहाटे ईडीने कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर छापा टाकला, तब्बल १० तासाच्यावर ही कारवाई सुरु होती. 

अनिल जयसिंघानी हा मोठा बुकी असून त्याच्यावर सट्टेबाजी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. अनिलच्या घरात ईडीला काय सापडले याची माहिती मात्र कळू शकली नाही. 

दरम्यान, तीन आयपीएल सामन्यांवर बेटींग करणाऱ्या २ बुकींना ईडीने अटक केली आहे. दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबात या ठिकाणी ईडीने छापे टाकले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.