SHOKING : 'आयपीएल'मधून सचिन कमबॅक करणार?

आयपीएलच्या माध्यमातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना मैदानात खेळताना दिसू शकतो... अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

Updated: Apr 11, 2015, 09:37 PM IST
SHOKING : 'आयपीएल'मधून सचिन कमबॅक करणार? title=

मुंबई : आयपीएलच्या माध्यमातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना मैदानात खेळताना दिसू शकतो... अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

ही शक्यता निर्माण झालीय सचिननं सोशल वेबसाईट ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे... या फोटोत सचिन मुंबई इंडियन्सचा लोगो असलेलं हेल्मेट परिधान करताना दिसतोय. ही काय भानगड आहे हे स्पष्ट न करता 'अंदाज बांधा??' असं या फोटोखाली म्हणत सचिननं त्याच्या चाहत्यांना बुचकाळ्यात पाडलंय. 

Guess whaaattt.. ?! pic.twitter.com/DwvFslym12

— sachin tendulkar (@sachin_rt) April 11, 2015

त्यानंतर, काही सेकंदातच सचिनचा हा फोटो व्हायरल झालाय. सर्वांना धक्का देत आयपीएलच्या माध्यमातून सचिन पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलंय. 

 २०१३ मधील आयपीएल फायनल जिंकल्यानंतर सचिनने आयपीएलमधून संन्यास घेतला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा 'मेन्टॉर' म्हणून सचिन खेळाडुंना प्रोत्साहन देताना दिसतो. 

आयपीएलच्या या मोसमातील ईडन गार्डनवरील कोलकाता विरूद्धची पहिली मॅच मुंबईने गमवली आहे. त्यांचा पुढील सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध सचिनच्या होम ग्राउंड वानखेडेवर होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.