ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला

 भारतीय जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचा तिसऱ्या टेस्टमध्ये एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. ईशांतने सिंघम स्टाइलमध्ये 'आता माझी सटकली' म्हणत श्रीलंकेच्या गोलंदाजाशी भिडला. 

Updated: Sep 1, 2015, 02:23 PM IST
ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला

कोलंबो :  भारतीय जलदगती गोलंदाज ईशांत शर्माचा तिसऱ्या टेस्टमध्ये एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. ईशांतने सिंघम स्टाइलमध्ये 'आता माझी सटकली' म्हणत श्रीलंकेच्या गोलंदाजाशी भिडला. 

भारताचा दुसरा डाव सुरू असताना ७६ व्या षटकात हा प्रकार घडला. धम्मिका प्रसाद याने ही ओव्हर टाकली. प्रसादने ईशांत शर्माला काही बाउंसर टाकले. ते ईशांतने सोडले आणि हसायला लागला. त्यानंतर रागात येऊन प्रसादने नियमांच्या विरूद्ध तिसरा बाउंसर टाकला त्याला अंपायरने नो बॉल ठरवला. 

SCORECARD : भारत Vs श्रीलंका (तिसरी टेस्ट)

दोन बाउंसर टाकल्यानंतर प्रसादने ईशांतला बॉडीलाइन बॉल टाकला, तो ईशांतने पाइंटकडे तडकावला. त्यावेळी ईशांत रन काढत असताना तो प्रसाद जवळून जात होता, त्यावेळी त्याने डोक्याला हात मारत प्रसादला सांगत होता. टाक मला अजून बाउंसर टाक. त्यानंतर गोलंदाजाने त्याला काही तरी बोलला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. ती पाहून श्रीलंकेचा दिनेश चंदीमल आला आणि त्याने भारतीय फलंदाजाला धक्का दिला. त्यानंतर भारतीय फलंदाज रविचंद्रन अश्विन नाराज झाला. 

अश्विनने अंपायर रोड टकर आणि नाइजेल लांग यांनी यात लक्ष घातले. श्रीलंका कर्णधार एंजलो मॅथ्यूजला आपल्या खेळाडूंना शांत करण्यास सांगितले. जे झाले त्यानंतर प्रसादने पुन्हा बाऊंसर टाकला. एक रन घेऊन अश्विनला आऊट केले. पण ईशांत पॅव्हेलियनकडे जात असताना प्रसाद त्याच्याकडे पळला आणि काही तरी म्हणाला. 

यापूर्वी ईशांतची कुशाल परेरा आणि रंगना हेराथ यांची बाचाबाची झाली होती. दुसऱ्या टेस्टमध्ये विरोधी खेळाडूंशी बाचाबाचीमुळे ईशांतच्या मॅच फीमधून ६५ टक्के रक्कम कापली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.