मुंबई: ऑस्ट्रेलियन बॅट्समन डेविड वार्नरनं इंग्लंड विरुद्ध आगामी वनडे आणि टी-२० सीरिजदरम्यान दारूला हात लावणार नसल्याचं ठरवलंय. विशेष म्हणजे वार्नरनं स्वत:च ही बंदी लागू करून घेतलीय.
आणखी वाचा - धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा!
अॅशेज जिंकले तर बंदी संपेल
वार्नरनं सांगितलं की जर ऑस्ट्रेलियन टीम अॅशेज सीरिज जिंकली तर आपल्यावरील ही बंदी तो संपवेल. एवढंच नव्हे तर सीरिजदरम्यान स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वार्नरनं मे महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅच दरम्यानही दारूला हात लावला नव्हता.
आणखी वाचा - धोनी आणि सेहवागनं मिळून घालवली अजंता मेंडिसचा जादू
सीएच्या वेबसाइटवर आलं वक्तव्य
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)च्या ऑफिशिअल वेबसाइटवर वॉर्नरचं हे वक्तव्य प्रसिद्ध झालंय. वॉर्नर म्हणतो, 'दारू सोडून मला पूर्ण १०० दिवस झाले आहेत. मला यादरम्यान अनेकदा दारू पिण्याची इच्छा झाली, पण मी टाळलं. मी कॅरेबियन दौऱ्यातही हे पाळलं होतं, मी सीरिजमध्ये आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू इच्छितो.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.