नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत हिना-जितूला सुवर्णपदक

नवी दिल्लीत सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल पिस्तोल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळालेय.

Updated: Feb 27, 2017, 05:11 PM IST
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत हिना-जितूला सुवर्णपदक title=

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल पिस्तोल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळालेय.

2014मधील आशियाई सुवर्णपदक विजेता जितू राय आणि हीना सिद्धूला यांनी मिश्र प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलेय. स्पर्धेतील पाचव्या दिवशी भारताला मिळालेले हे सोनेरी यश आहे. 

जितू राय-हिना सिंधूने जपानच्या युकारी कोनिशी आणि तोमोयोकी मत्सुदा या जोडीला 5-3 असे पराभूत केले आणि सुवर्णपदक पटकावले.  दरम्यान हा मिश्र प्रकार या स्पर्धेत प्रायोगिक तत्त्वावर खेळवण्यात येत आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात मिश्र लढतींची चाचपणी सुरू आहे.