मुंबई : ऑस्ट्रेलियाला दोन वेळा वर्ल्डकप जिंकून देणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन, आणि सध्या आयपीएलमधील मुंबई इंडियन टीमचा कोच रिकी पॉंटिगनं मुंबई इंडियनचा कॅप्टन रोहित शर्माचं कौतुक केलं आहे.
आयपीएल-८ मध्ये रोहितची कॅप्टन्सी पाहण्याजोगी असेल. रोहितच्याच नेतृत्वामध्ये मुंबईनं २०१३मध्ये आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. रोहितला या खेळाची योग्य समझ आहे. तसंच आपल्या सहखेळाडूंसोबत तो चांगलं समन्वय साधतो, असं पॉटिंगनं सांगितलं.
टीमचे काही खेळाडू वर्ल्डकपनंतर थेट आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्याचा खेळाडूंच्या खेळावर काही परिणाम होईल का? यावर बोलतांना पॉटिंगनं सांगितलं की, सगळे खेळाडू अनुभवी आहेत. त्यांना क्रिकेटमधील वेगवेगळ्या प्रकारात खेळण्याचा अनुभव आहे. तसंच आम्ही चांगली तयारी केली आहे. खेळाडू चांगलं प्रदर्शन देतील, अशी अपेक्षा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.