मुंबई : भारताचा फास्ट बॉलर जसप्रित बुमराहच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. एका वर्षामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 विकेट घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर नोंदवला गेला आहे.
बुमराहनं 2016 या वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये तब्बल 28 विकेट घेतल्या आहेत. एका वर्षात सर्वाधिक टी-20 विकेट घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर डर्क नेन्सचं नाव आहे. नेन्सनं 2010 मध्ये 27 विकेट घेतल्या होत्या.
पाकिस्तानच्या सईद अजमलनं 2012मध्ये 25 विकेट घेतल्या होत्या, तर चौथ्या क्रमांकावर भारताचा आर.अश्विन आहे. यंदाच्या वर्षात अश्विननं 23 टी-20 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा शेन टॅट या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. टॅटनं 2010 मध्ये 22 टी-20 विकेट घेतल्या होत्या.