मियामी : डब्ल्यूडब्ल्यूईमधला स्टार रेसलर जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की बेलाने स्वत:वर लागलेले आरोप फेटाळून लावले आहे. निक्कीने एका मॅग्जीनला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हटलं की,, मी महागडे वस्तू माझ्या जीवावर घेते आणि जगते. माझा बॉयफ्रेंड हँडसम आहे आणि यशस्वी देखील तर यामध्ये माझी काय चुकी आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. आम्ही सोबत आहोत. मी माझे बिल स्वत: भरते. मी त्याच्याकडून काहीही घेत नाही आणि मी लालची नाही.'
निक्कीने पुढे म्हटलं की, लोकं जे माझ्या बद्दल बोलतात ते खोटं आहे. मी माझ्या ब्रँडेड बॅग, कपडे, कार स्वत:च्या पैशाने विकत घेतली आहे. जॉन सीनाने जुलै 2009 मध्ये एलिजाबेथसोबत लग्न केलं होतं. पत्नी एलिजाबेथशी फारकत झाल्यानंतर जॉन सीना डब्ल्यूडब्ल्यूईमधील निक्की सोबत डेटिंग करत होता. निक्कीचं म्हणणं आहे की, जॉन खूप केअरिंग आहे आणि ती त्याच्याविना नाही जगू शकत.