बांगलादेशच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

आशिया कपच्या फायनलमध्ये भारताकडून बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर बांगलादेशची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जातेय. 

Updated: Mar 7, 2016, 12:23 PM IST
बांगलादेशच्या पराभवानंतर सोशल मीडियावर जोक्सचा महापूर title=

मिरपूर : आशिया कपच्या फायनलमध्ये भारताकडून बांगलादेशचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर बांगलादेशची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जातेय. 

बांगलादेश आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर बांगलादेशच्या चाहत्यांनी धोनीचं शिर हातात घेतलेला तस्कीन अहमदचा फोटो टाकला होता. मात्र अंतिम फेरीत भारताने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर याच बांगलादेशची सोशल मीडियावर टर उडवली जातेय. 

एका फोटोत धोनी बांगलादेशच्या कर्णधारा हात वर करुन सांगतोय की त्या दिशेला सायबर कॅफे आहे. तेथे तुम्ही चषकाचा फोटो फोटोशॉप करु शकता. तसेच ट्विटरवरही बांगलादेश संघावर जोक्स सुरु आहेत.