आता गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणार कोहली आणि धवन

भारतीय टेस्ट कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि जलद गोलंदाज ईशांत शर्मा १० ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकड़ून दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व गौतम गंभीर करणार आहे. 

Updated: Dec 4, 2015, 09:06 PM IST
आता गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणार कोहली आणि धवन title=

नवी दिल्ली : भारतीय टेस्ट कर्णधार विराट कोहली, सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि जलद गोलंदाज ईशांत शर्मा १० ते १८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकड़ून दिल्लीच्या संघात सामील झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व गौतम गंभीर करणार आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिरीज सध्या शक्य दिसत नसल्याने या तिघांचे दिल्लीच्या संघात निवड करण्यात आली आहे. येत्या जानेवारी महिन्यापासू ऑस्ट्रेलियातील वन डे दौऱ्यापूर्वी एक महिना सराव मिळाव म्हणून ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

यात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला नेतृत्वाची धुरा सांभाळण्यात का आली नाही, असे विचारले असता निवड समितीचे अध्यक्ष विनय लांबा म्हणाले, गौतम गंभीरला संपूर्ण सीझनसाठी कर्णधार बनविला होता. आंतरराष्ट्रीय खेळाडू उपलब्ध नव्हते म्हणून गंभीरलाच कर्णधार ठेवण्यात आले. विराटने गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळल्यास काही फरक पडले असे मला वाटत नाही. 

टीम: गौतम गंभीर (कप्तान), उन्मुक्त चंद, शिखर धवन, विराट कोहली, नीतीश राणा, मिलिंद कुमार, मनन शर्मा, पवन नेगी, आशीष नेहरा, प्रदीप सांगवान, ईशांत शर्मा, नवदीप सैनी, सुबोध भाटी, शिवम शर्मा, राहुल यादव।
स्टैंड बाय: ध्रुव शोरे, वैभव रावल, विकास टोकस

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.