नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशहा सुपरस्टार शाहरुख खान याने कॅरेबियन प्रिमियर लीगमधील त्रिनिदाद अँड टोबॅगो या संघाची अन्य दोघांच्या साथीने खरेदी केली आहे. आयपीएलमधील कोलकता नाईट रायडर्स संघाचा यापूर्वी शाहरूख खान सहमालक आहे.
शाहरुख खानने हॉलिवूड अभिनेता मार्क वाल्बर्ग आणि जेरार्ड बटलर यांच्या साथीने या संघाची मालकी मिळविली आहे. शाहरुख हा सध्या कोलकता नाईट रायडर्सचा अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता याच्यासह सहमालक आहे.
वल्बर्ग आणि बटलर यांच्याकडे यापूर्वीच कॅरेबियन प्रिमियर लीगमधील संघांची सहमालकी आहे. वेल्बर्ग यांच्याकडे बार्बाडोस ट्रेन्डन्ट आणि बटलर यांच्याकडे ख्रिस गेलच्या नेतृत्वाखाली जमैका तलावा संघाची सहमालकी आहे.
कॅरेबियन प्रिमियर लीग वेस्टइंडीजमध्ये प्रसिद्ध असून, या स्पर्धेत वेस्टइंडीजसह अनेक परदेशी खेळाडू खेळतात. या लीगच्या तिसऱ्या मोसमात २० जूनपासून सुरवात होत असून, मालिका २६ जुलैपर्यंत खेळविण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.