कुमार संगकारा ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत

इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केलेल्या कुमार संगकारासमोर श्रीलंका सरकारनं ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला तर त्याची दुसरी इनिंग सुरु होईल.

PTI | Updated: Aug 26, 2015, 12:57 PM IST
कुमार संगकारा ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत title=

कोलंबो : इंटरनॅशनल क्रिकेटला अलविदा केलेल्या कुमार संगकारासमोर श्रीलंका सरकारनं ब्रिटनमध्ये श्रीलंकेचा राजदूत बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला तर त्याची दुसरी इनिंग सुरु होईल.

अधिक वाचा : VIDEO : जाता जाता संगकाराला आपले अश्रू आवरणंही झालं कठिण!

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांनी संगकारासमोर त्याच्या अखेरच्या टेस्टनंतर गौरव करताना हा प्रस्ताव ठेवलाय. लंकन सरकारनं दिलेल्या या प्रस्तावाबाबात आपण निश्चितच विचार करु, अशी प्रतिक्रिया संगकारानं दिली आहे. 

अधिक वाचा : महान क्रिकेटर संगकाराबद्दल १० महत्वाच्या गोष्टी

राष्ट्रपतींच्या प्रस्तावाचा मी आदर करतो मात्र, माझ्याकडे एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याचा अनुभव नाही. त्याचप्रमाणे यासाठी लागणारी माहितीही नाही, अशी प्रांजळ कबुली संगकारानं दिलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.