धोनीच्या नेतृत्वात टीम इडियाने मिळवलेले विजय

कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने जिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे. जिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत. 

Updated: Jun 15, 2016, 01:10 PM IST
धोनीच्या नेतृत्वात टीम इडियाने मिळवलेले विजय title=

मुंबई : कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने जिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे. जिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत. 

महेंद्र सिंग धोनी सर्वात जास्त टेस्ट आणि वनडे सीरीज जिंकणारा कर्णधार बनला आहे. धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने १३ वी वनडे सीरीज जिंकली. जिम्बाब्वे विरोधात 2 वनडे मॅच जिंकत टीम इंडियाने ६४ वा विजय साजरा केला आहे. धोनीच्या कॅप्टन्सी खाली टीम इंडियाने एकूण १२३ मॅच खेळल्या आहेत.

टी-20 मध्ये धोनीने ४७ पैकी २९ मॅच जिंकल्या आहेत. ज्या संपूर्ण विदेशात खेळल्या गेल्या आहेत. या वर्ष टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये कंगारु विरोधात सीरीज जिंकली. बांग्लादेशमध्ये आशिया कप अपल्या नावे केला. टी-20 विश्वकप मध्ये सेमीफाइनल पर्यत मजल मारली.

पाहा संपूर्ण यादी

कॉमनवेल्थ बँक सीरीज- ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका-2007/08
भारत-श्रीलंका सीरीज- 2008 3 पैकी २ विजय
भारत श्रीलंका सीरीज- 2009/9, 4-1
भारत-न्यूजीलंड सीरीज- 2008/09, 3-1
भारत-वेस्टइंडीज सीरीज- 2009, 2-1
कॉपैक कप, भारत-न्यूजीलंड-श्रीलंका, 2009
एशिया कप, बांग्लादेश-पाकिस्तान-श्रीलंका-भारत, 2010
वेस्ट इंडीज दौरा- 2011, 3-2
भारत श्रीलंका में- 2012, 4-1
आयसीसी चँपियंस ट्रॉफी- 2013
वेस्ट इंडीज भारत-श्रीलंका-वेस्टइंडीज, 2013
इंडिया, इंग्लंड- 2014, 3-1
भारत, जिम्बाब्वे 2016, 2-0